latest Post

आयुश फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबीर आयोजीत

आयुश फाउंडेशन परभणी या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. ७ जुलै २०१७ रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीराचे आयोजन शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. संदीप कार्ले यांचे सर्वज्ञ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. येथील थैलेसीमिया डे केयर सेंटरच्या थैलेसीमिया पिडीत बालकांना रक्त पुरवठा करण्यासाठी हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात आयुश फाउंडेशनच्या ऐकूण ११ रक्तदात्याने स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी डॉ. संदीप कार्ले यांनी उपस्थितांना थैलेसीमिया या आजाराची माहिती देवून मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संकलन पेढीतील डॉ. कनकदंडे, जनसंपर्क अधिकारी श्री सुहास देशमुख व त्यांच्या चमूने शास्त्रोक्त पद्धतीने रक्त संकलन केले. आयुश फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सौ. रेखा पुंड आणि संस्थापक सचिव श्री वामनकुमार वाणी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच फाउंडेशनचे सदस्य श्री सतीश अनवते, श्री नकुल पवार, श्री महेंद्र हुलेकर यासह फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री दिपक ढवळे, श्री अतुल रणखांब वा प्रा. माधव पाटील यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

About Kumar Wani

Kumar Wani
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment